जलकुंभाचे काम निकृष्ट
By Admin | Updated: November 23, 2014 00:12 IST2014-11-23T00:12:01+5:302014-11-23T00:12:01+5:30
पार्डी टकमोर येथील प्रकार.

जलकुंभाचे काम निकृष्ट
पांडव उमरा (वाशिम): महाराष्ट्र जिवन प्राधिकरण ग्रामीण योजना अंतर्गत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सुविधा करण्याच्या हेतूने वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथे पाणीपुरवठा कामाला प्र त्यक्ष सुरुवात होवून एकमहिना उलटला तरी सुध्दा सव्वा दोन कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील टाकी बांधकामाच्या ठिकाणी कामाविषयी अंदाजपत्रक व माहिती दर्शक फलक अजूनही लावण्यात आलेला नाही. पाणी पुरवठयाच्या कामाची सुरुवात टाकी बांधकाम करण्यापासून केली असून बांधकामाकरिता वा परण्यात येत असलेली रेती ही निव्वळ माती मिङ्म्रीत असल्यामुळे सदर बांधकाम थातुर मातुर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कामाविषयी उपलब्ध निधीचा लेखा जोख्याचा माहिती दर्शक फलक लावला असता तर खरा चेहरा समोर येण्याची शक्य ता असते. याच भिती पोटी सव्वा दोन कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर कामाविषयी माहिती दर्शक फलक लावला नाही. ही बाब खेद जनक म्हणावी लागेल. टाकी बांधकामावर नियमितपणे पाणी टाकण्यात येत नसून सदर काम बोगस होत असल्याचा असा प्रमुख आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. पाणी पुरवठा योजनेची जनू काही थट्टा मस्करी केल्या प्रमाणे पाणी टाकले जाते. याकडे जिवन प्राधिकरण विभागोच कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. या अगोदरही पार्डी टकमोर येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केल्या गेला मात्र ती योजना मृगजळ ठरल्याची पहावयास मिळते. महाराष्ट्र जिवन प्राधिकरण सव्वा दोन कोटी रुपये किंमतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या बांधकामावर अंदाजपत्रक व माहिती दर्शक फलक लावण्याचे आदेश बासनात गुंडाळल्याचे यावरुन दिसून ये ते. या विषयी जिवन प्राधिकरण विभाग वाशिम शाखा अभियंता देशमुख यांच्याशी त्यांची प्रतिक्रीया घेण्यासाठी संपर्क साधला पण संपर्क होवू शकला नाही.