गुप्तधनाच्या प्रकारातूनच पतीचा खून
By Admin | Updated: August 5, 2014 20:36 IST2014-08-05T00:24:31+5:302014-08-05T20:36:39+5:30
गुप्तधनाच्या प्रकारातून पतीचा खून झाला असून, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्या ‘त्या’ दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

गुप्तधनाच्या प्रकारातूनच पतीचा खून
मानोरा : गुप्तधनाच्या प्रकारातून पतीचा खून झाला असून, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्या ह्यत्याह्ण दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ; अन्यथा अमरावती विभागीय कार्यालयावर १५ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्या करू असा ईशारा भुली येथील शितल शिवचंद्र आडे यांनी २ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. भुली येथील शितल शिवचन्द्र आडे हिने दिग्रस येथील ग्रामीण रूग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. हे बाळ पाहण्यासाठी ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तिचे पती शिवचन्द्र आडे यांचे मित्र चंद्रशेखर हिरासिंग चव्हाण व अमोल पवार हे ग्रामीण रूग्णालयात आले होते. मित्रांच्या आग्रहाखातर शिवचंद्रने दोघांना पुसद येथे पार्टी दिली व या दिवशी सायंकाळी ते दिग्रसला परत आले. दरम्यान, सायंकाळी तिघेही मोटारसायकलने भुली येथे जाण्यासाठी निघाले. शिवचंद्रच्या मित्रांना गुप्तधन काढण्याचा छंद होता. या प्रकारातून मानोरा ते दिग्रस रस्त्यावरील वाईगौळ ते पंचाळा विटभट्टीजवळ दोघांनी शिवचंद्रच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रकार करून प्रेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले, असा आरोप शितल आडे यांनी निवेदनातून केला आहे. निवेदनाच्या प्रति संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.