अपघातात पती ठार; पत्नी गंभीर
By Admin | Updated: March 25, 2017 02:29 IST2017-03-25T02:29:15+5:302017-03-25T02:29:15+5:30
अपघातात दुचाकी चालक ठार झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली

अपघातात पती ठार; पत्नी गंभीर
कारंजा लाड , दि. २४- वाशिम येथून नागपुरकडे जाणार्या गाडीने दुचाक ीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक ठार झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना २४ मार्च रोजी कारंजा-अमरावती भडशिवणी फाट्याजवळ घडली.
बँकेला पैसे पोहोचविणार्या गाडीने (एम.एच.३१ डी.एस ५0६३) पारवा कोहर येथून कारंजाकडे येणार्या दुचाकीला (एम.एच.३७ बी ८२७७) धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील जनार्धन बाजीराव डवले (६0), भगीरथीबाई जनार्धन डवले (५0) हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. दोघांना तात्काळ कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जनार्धन डवले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भगीरथीबाई डवले यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.