सोयाबीन पीक विम्यासाठी उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:04+5:302021-02-05T09:22:04+5:30
गतवेळच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोप परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर काढणीवर आलेल्या सोयाबीनलाही परतीच्या पावसामुळे ...

सोयाबीन पीक विम्यासाठी उपोषणाचा इशारा
गतवेळच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोप परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर काढणीवर आलेल्या सोयाबीनलाही परतीच्या पावसामुळे अंकूर फुटले. यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. त्यामुळे त्यांनी विमा मिळण्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज केले. या पीक नुकसानाचे पंचनामेही प्रशासनाने केले, परंतु शेतकऱ्यांना कवडीचाही मोबदला मिळालेला नाही. विशेष म्हणजे पीकविमा कंपनीने बहुतांश शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीचे कारण समोर करून विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक हा त्या वेळी सतत बंद राहत होता. तेव्हा नुकसानाने आधीच वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार करायची तरी कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनानेही या प्रकाराची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याचा लाभ देण्याच्या मागणीसाठी १ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा ॲड. भागवत नरवाडे यांनी दिला आहे.