मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे?
By Admin | Updated: September 21, 2014 22:43 IST2014-09-21T22:43:07+5:302014-09-21T22:43:07+5:30
वाशिम जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छूकांना पडला प्रश्न.
मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे?
वाशिम : कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीमध्ये जागावाटपावरून आलेली बिघाडी,शिवसेना- भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमधील खेचाखेची त्यातच सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित होत नसल्याने इच्छूकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. नामांकन भरण्याच्याच्या प्रक्रियेनंतर प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार असल्याने प्रत्ये उमेदवारांडे पोहोचायचे कसे असा प्रश्नही इच्छूकांना भेडसावत आहेत.
ज्यांना उमेदवारीची खात्री आहे किंवा पक्षाकडून ह्यकाम सुरू कराह्ण असा संदेश आला आहे, अश्या इच्छूकांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. काही विद्यमान आमदारही सद्या रेडझोन मध्ये आहेत. त्यामुळे प्रचाराला सुरूवात करावी तरी कशी, प्रचाराला सुरूवात केली आणि वेळेवर उमेदवारीने हुलकावणी दिलीच तर मेहनत व पैसा दोन्हीही पाण्यात जाण्याची भीती आहे.
जिल्ह्यातील काही विद्यमान आमदार आणि इतर पक्षांतील दोन-चार इच्छुक उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेवर प्रत्यक्ष प्रचाराला लागले आहेत. मात्र, आघाडी व महायुती झाली नाही तर काय होईल, या चिंतेने त्यांनाही ग्रासले असून, परिचय पत्रके, बॅनर तसेच इतर प्रचार साहित्य तयार करण्यात अडचणी येत असल्याचे एका इच्छूकाने सांगितले. ऐन निवडणूकीच्या तोंडावर आघाडीत बिघाडी झाली तर घटक पक्षांतील नेत्यांची छापलेली छायाचित्रे अडचणीची ठरतील. त्यामुळे हे काम सध्या स्थगितच ठेवले असल्याचेही दिसून येत आहे.
** प्रचार साहित्याची जुळवाजुळव करताना उमेदवारांची होणार दमछाक
भारतीय जनता पक्ष- शिवसेना- रिपाइं- शिवसंग्राम- स्वाभिमानी शेतकरी संघटना- राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यातील महायुती तुटण्याच्या उंबरठय़ावर आली आहे. महायुती तुटल्यास सर्वच पक्षाची पंचाईत होणार आहे. महायुतीच्या काही घटक पक्षांनी प्रचारासाठी पोस्टर, बॅनर्स बनविले आहे. त्यावर महायुतीतीलसर्वच घटक पक्षांच्या नेत्यांचे छायाचित्र आहे, सदर पक्षांचे निशान अथवा लोगो आहे. महायुती तुटल्यास हे सर्व साहित्य कचर्यात फेकावे लागेल. विधानसभेचे मतदान अगदी तोंडावर येऊन ठेपले असताना या कमी कालावधीत या साहित्याची जुळवाजुळव करताना राजकीय पक्षाच्या नाकीनऊ येणार असल्याचेच दिसून येत आहे. सर्वात किचकट बाब म्हणजे महायुतीच्या प्रचारासाठी एक गीत तयार करण्यात आले आहे. या गीतामध्ये महायुतीचा भगवा फडकविण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे. आता महायुती तुटल्यास हे गीत बदलावे लागणार आहे.