पदपथावरही अतिक्रमण असताना अधिकारी गप्प कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:01+5:302021-09-24T04:48:01+5:30

वाशिम : पदपथ (फूटपाथ) हा एक प्रकारचा मार्ग आहे. ज्याचा वापर फक्त पादचाऱ्यांसाठीच केला जाताे; पण यावरही अनेक ...

How can an officer be silent when there is encroachment on the sidewalk? | पदपथावरही अतिक्रमण असताना अधिकारी गप्प कसे?

पदपथावरही अतिक्रमण असताना अधिकारी गप्प कसे?

वाशिम : पदपथ (फूटपाथ) हा एक प्रकारचा मार्ग आहे. ज्याचा वापर फक्त पादचाऱ्यांसाठीच केला जाताे; पण यावरही अनेक महिन्यांपासून अतिक्रमण असताना संबंधित अधिकारी गप्प कसे, असा प्रश्न निर्माण हाेत आहे. यामुळे काही व्यावसायिकही त्रस्त आहेत. काही जण तर शेवटच्या वेळी अतिक्रमण कधी काढले हाेते हेही आठवत नसल्याचे बाेलताना दिसून येत आहेत.

वाशिम शहराला अतिक्रमणाच्या विळख्याने घेरले आहे. परिणामी, वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी, तसेच पदपथावर लहान- मोठी दुकाने थाटली असून, त्यामुळे एकीकडे अतिक्रमण वाढले आहे, तर दुसरीकडे वाहतुकीची कोंडी होत आहे. याचे मात्र नगर परिषद प्रशासनाला काहीही देणे- घेणे दिसून येत नाही. शहरातील मुख्य रस्त्यासह जवळपास सर्वच पदपथांवर अतिक्रमण झालेले असून, यावर शेकडाे लघु व्यावसायिकांनी आपला व्यवसाय थाटला आहे.

----

वाशिम शहरात सर्वत्र अतिक्रमणांचा विळखा आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. शहरातील अतिक्रमणे काढून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

-शिवाजी वाटाणे,

वाशिम

----

शहरातील वाढलेले अतिक्रमण काढण्यास त्वरित कारवाई करण्यात येईल. शहरात वेळाेवेळी अतिक्रमण वाढल्यानंतर अतिक्रमण माेहीम हाती घेण्यात आली आहे. काेराेना काळामध्ये हे शक्य नव्हते, तसेच सर्वच उद्याेगधंदे ठप्प पडले हाेते. शहराची पाहणी करून याेग्य नियाेजन करण्यात येईल.

-दीपक माेरे,

मुख्याधिकारी, वाशिम

Web Title: How can an officer be silent when there is encroachment on the sidewalk?