लाभार्थ्यांना लवकरच घरकुलाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST2021-06-19T04:27:23+5:302021-06-19T04:27:23+5:30

या संदर्भात गजाला खान यांनी मंत्रालयात जाऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी वितरित करणेबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. घरकूल ...

Household funds to beneficiaries soon | लाभार्थ्यांना लवकरच घरकुलाचा निधी

लाभार्थ्यांना लवकरच घरकुलाचा निधी

या संदर्भात गजाला खान यांनी मंत्रालयात जाऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी वितरित करणेबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. घरकूल आवास योजनेच्या रखडलेल्या निधीचा प्रश्न सतत पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. मंगरूळपीरला नगर परिषेदेला १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मुख्याधिकारी यांनी हमीपत्र दिल्यावर हा निधी घरकूलधारकांना वितरित करण्यात येणार आहे. जनतेने कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये व घरकुलाचे नावावर कोणालाही पैसे देऊ नये. घरकुलाचे पैसे मिळवून देतो असे म्हणून काही मंडळी गरीब लोकांची फसवणूक करीत आहेत व काही लोकांनी गरीब घरकूलधारकाकडून वसुली केल्याची माहिती आहे. घरकुलाचे पैसे काढून देतो म्हणून कोणीही कोणत्याही प्रकारची मागणी केल्यास जनतेने थेट माहिती द्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा यांनी केले आहे.

Web Title: Household funds to beneficiaries soon