घराला आग; एका लाखाचे नुकसान
By Admin | Updated: January 28, 2016 23:07 IST2016-01-28T23:07:14+5:302016-01-28T23:07:14+5:30
रिसोड तालुक्यातील घटना.

घराला आग; एका लाखाचे नुकसान
रिसोड (जि. वाशिम) : तालुक्यातील करडा येथील दत्तराव उमाजी धांडे यांच्या कुडाच्या घराला आग लागून शेतीमाल धान्यासह जवळपास १ लाखाचे नुकसान झाल्याची घटना २८ जानेवारीला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ग्राम करडा येथील पोलीस पाटील भानुदास कष्टे यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिलेल्या अहवालानुसार, करडा येथे गुरूवारी दुपारच्या सुमारास कुडाच्या घराला अचानकपणे आग लागली. यामध्ये घरामधील १0 पोते सोयाबीन, ४ पोते तुरी व घरोपयोगी साहित्य आगीमुळे जळून खाक झाले. रिसोड येथून अग्निशामक गाडी उशिरा पोहोचल्याने आग लवकर आटोक्यात आली नाही. गावकर्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. महसुल प्रशासनाने वृत्त लिहेपर्यंत सदर आगग्रस्त घटनेचा पंचनामा केला नव्हता.