संस्थाचालकांचे घंटानाद आंदोलन
By Admin | Updated: March 6, 2015 01:56 IST2015-03-06T01:56:13+5:302015-03-06T01:56:13+5:30
वाशिम जिल्हय़ातील संस्थाचालकांची विविध मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी.

संस्थाचालकांचे घंटानाद आंदोलन
वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षक संस्थाचालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या पृष्ठभूमीवर विविध मागण्यांसंदर्भात आवाज उठविण्यासाठी ५ मार्च रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जिल्हय़ातील शिक्षक व संस्था चालकांनी घंटानाद आंदोलन केले. वेतनेतर खर्चाची परिपूर्ती अनुदानाबाबत, इंग्रजी शाळेमध्ये शासनाच्या आदेशान्वये २५ टक्के मागासवर्गीय मुलांना प्रवेश दिला. त्याच्या फीची रक्कम ३ वर्षांंंपासून शासनाने अदा केली नाही. इतर राज्यांप्रमाणे शाळांना वीज सवलतीच्या दरामध्ये देण्याबाबत संस्थाचालकांच्या जुन्या मागण्यांवर काहीच प्रतिसाद न मिळाल्याबाबत, नविन शाळा, कॉलेजेस, आयटीआय आदींच्या मंजुरीसाठी कायम विना अनुदानित पद्धत सन २000 नंतर लागू गेली, त्यापूर्वी मंजूर झालेल्या सर्व कॉलेजेस, शाळा, आयटीआय, शेतकी शाळा, इत्यादींना अनुदान देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याबाबत शासनाने टाळाटाळ करणे चालविले आहे, मोफत शिक्षण हक्क कायद्याचा चुकीचा अर्थ लावून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत उलट- सुलट निर्णय चालू आहे. यावर तोडगा म्हणून संस्था चालक, पालक, शिक्षक, तज्ज्ञ आदी घटकांचा सल्ला घेऊन महाराष्ट्र शिक्षण कायदा करण्यात यावा, अशी मागणी आहे. वरील मागण्या यापूर्वी शासनाकडे वेळोवेळी सादर केलेल्या आहे; मात्र प्रलंबित आहेत. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रा.की. सोमटकर, सचिव अँड. किरणराव सरनाईक, शांताबाई शिंदे, भाऊसाहेब काळे, पी.डी. देशमुख, बबनराव कोल्हे, आर. एस. बोनकिले, आर. व्ही. वानखडे यांची उपस्थिती होती.