हॉटेलमध्ये कुंटणखाना

By Admin | Updated: September 13, 2014 00:41 IST2014-09-13T00:41:26+5:302014-09-13T00:41:26+5:30

औरंगाबाद : रेस्टॉरंट आणि लॉजिंगच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दौलताबाद, अब्दीमंडी येथील एका हॉटेलवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी छापा मारला.

Hotel in the vicinity | हॉटेलमध्ये कुंटणखाना

हॉटेलमध्ये कुंटणखाना

औरंगाबाद : रेस्टॉरंट आणि लॉजिंगच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दौलताबाद, अब्दीमंडी येथील एका हॉटेलवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी छापा मारला. या छाप्यात दोन आंटीसह दलाल आणि हॉटेल मॅनेजर यांना पोलिसांनी अटक केली. या छाप्यात ग्राहकांना पुरविण्यासाठी आणण्यात आलेल्या दोन तरुणीही सापडल्या.
नाजिया बेगम शेख अफजल (रा. अजीज कॉलनी, नारेगाव), इरम परवीन शेख (३०, रा. रोझाबाग), हॉटेलमालक नरेंद्र महावीरसिंग हजारी (३३, रा. दौलताबाद) आणि हॉटेल मॅनेजर शिवा कडुबा म्हस्के (२८, रा. दौलताबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, दौलताबाद रोडवरील अब्दीमंडी येथील यशराज रेस्टॉरंट आणि लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त बाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली दौलताबाद ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि महिला पोलिसांनी सोबत प्रतिष्ठित पंच घेऊन हॉटेलवर बनावट ग्राहक पाठविला.
त्यावेळी हॉटेल मॅनेजर, मालक आणि यांनी आंटीसोबत त्याची भेट झाली. याप्रसंगी आरोपींनी त्या बनावट ग्राहकांस दोन मुली दाखविल्या. त्यासाठी त्यांनी चार हजार रुपये सांगितले. त्यात आंटीचे दोन हजार रुपये, एक हजार रुपये मुलीला तर रूमभाडे म्हणून एक हजार रुपये, असे असल्याचे आरोपींनी ग्राहकास सांगितले.
वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर ग्राहकाने हॉटेलमध्ये साध्या वेशात सापळा रचून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी तातडीने त्या रूमवर छापा मारला. दोन्ही मुली, आंटी आणि हॉॅटेल मालक, मॅनेजरला ताब्यात घेतले. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईवरून आणायच्या मुली
ग्राहकांना पुरविण्यासाठी आरोपी हे मुंबईहून मुलींना घेऊन येत असत. आज छाप्यात पकडण्यात आलेली एक मुलगी मुंबईची, तर एक औरंगाबादेतील रहिवासी आहे. त्यांच्या विरोधात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या छाप्यात पोलीस कर्मचारी अशोक नरवडे, गोकुळ वाघ, विलास कुलकर्णी, प्रकाश काळे, कैसर पटेल, नवाज पठाण, प्रमोद देवकते, भाऊसिंग चव्हाण, कमल गदई, महिला कर्मचारी जयश्री फुके, कल्पना जांबोटकर यांनी सहभाग घेतला.

Web Title: Hotel in the vicinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.