गारपीटग्रस्तांचे पुन्हा सर्वेक्षण सुरु
By Admin | Updated: August 2, 2014 23:14 IST2014-08-02T23:14:11+5:302014-08-02T23:14:11+5:30
गावकरी पुन: सर्वेक्षणासाठी वाशिम येथे उपोषणास बसले होते.

गारपीटग्रस्तांचे पुन्हा सर्वेक्षण सुरु
वाकद : वाडी वाकद गावकरी पुन: सर्वेक्षणासाठी वाशिम येथे उपोषणास बसले होते. त्यांना प्रयत्नास यश आले असून तेथे तहसिलचे कर्मचारी येथे पोहोचले. सर्व्हेक्षणास पुन्हा सुरुवात केली आहे. वाडी वाकद येथे ८ मार्च २0१४ राजी गारपीट झाली. यामध्ये सर्व शेतकरी कष्टकरी मजुरांचे घरांचे टिनपत्रे फुटले गेले. गुरं जनावरांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये बकर्या, मेंढय़ा, कोंबड्या जीवितहानी झाली.त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री व इतर मंत्री यांनी पाहणी केली होती.जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष गारपीटग्रस्तांना त्यामध्ये समाविष्ट असलेले २५ पारधी समाजाच्या तसेच इतर कुटुंबा प्रत्येकी १२00 तात्काळ मदत केली. मात्र यामध्ये काही गारपीटग्रस्त वंचित राहिले. त्यांचा पुन्हा सर्वेक्षण करुन याचा लाभ, मदत मिळावी म्हणून मानवी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश महासचिव गजानन खंदारे, विदर्भ अध्यक्ष भारत अंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हाधिककारी कार्यालयासमोर गारपीग्रस्तग्रस्तांचे आरमण उपोषण १५ जुलै पासून सुरु केले होते. यावेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत संघटनेच्यावतीने त्यांच्याशी चर्चा करुन उपविभागीय अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार ३0 जुलै रोजी महसुल विभागाचे ना.तहसिलदार सरनाईक,मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, मानवी हक्क सुरक्षा दलाचे पथक आदी मान्यवर व इतर कर्मचारी सर्वेक्षण पथक ग्रा.पं. कार्यालय वाडी वाकद येथे दाखल झाले. वंचित राहिलेल्या आपत्तीग्रस्तांना सोबत वरील अधिकार्यासोबत चर्चा करुन पात्र यादीत समाविष्ट केले,असा अहवाल येथील सरपंच पो. पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला.