वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध आशा, गटप्रवर्तक एकवटल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:40 IST2021-02-10T04:40:22+5:302021-02-10T04:40:22+5:30

वारला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असताना, आरोग्यविषयक सर्व कर्तव्य पार पाडले जात आहे. ...

Hope, group promoters rallied against medical officers! | वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध आशा, गटप्रवर्तक एकवटल्या!

वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध आशा, गटप्रवर्तक एकवटल्या!

वारला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असताना, आरोग्यविषयक सर्व कर्तव्य पार पाडले जात आहे. कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोधमोहीम असो की, माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम असो, या सर्व मोहिमेत आशा, गटप्रवर्तकांनी कर्तव्य बजावले आहे. कामाचा मोबदला नियमित मिळत नाही, तीन महिन्यांपासून मोबदला बँक खात्यात जमा करण्यात आला नाही, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळते, अशी तक्रार आशा व गटप्रवर्तकांनी ८ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. एका वर्षापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने तक्रार केली असता, प्रभार काढण्यात आला होता; परंतु काही दिवसांतच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला. याप्रकरणी न्याय मिळावा, प्रलंबित मोबदला तातडीने देण्यात यावा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आशा व गटप्रवर्तकांचा पदभार काढण्यात यावा, अशी मागणी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी केली.

Web Title: Hope, group promoters rallied against medical officers!