राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:39 IST2021-08-29T04:39:03+5:302021-08-29T04:39:03+5:30

वाशिम : अहमदाबाद(गुजरात) येथे झालेल्या प्री-नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेत प्रावीण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंचा जिल्हा रायफल असोसिएशनच्यावतीने स्थानिक हॅपी ...

Honoring national players | राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

वाशिम : अहमदाबाद(गुजरात) येथे झालेल्या प्री-नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेत प्रावीण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंचा जिल्हा रायफल असोसिएशनच्यावतीने स्थानिक हॅपी फेसेस स्कूलच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप हेडा यांच्यासह या सर्व खेळाडूंना घडविणारे प्रशिक्षक प्रल्हाद आळणे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी.के. चव्हाण यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता निवड झालेल्या ऋषभ ढवळे, क्षितिज राऊत,अरहंत घुगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . तसेच पिस्टल या क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या सोनल चव्हाण,मृणाली आकरे,जान्हवी मानतकर या खेळाडू मुलींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. रायफल असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप हेडा यांनी खेळाडूंना रायफल असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे म्हटले.

हॅपी फेसेस स्कूलची विद्यार्थिनी सोनल चव्हाण हिचासुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य सिध्दार्थ चौबे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर वाघ,क्रीडा मार्गदर्शक रंजित कथडे यांची उपस्थिती होती.

Web Title: Honoring national players