उत्कृष्ट अधिका-यांचा ‘सन्मान’

By Admin | Updated: April 22, 2017 00:11 IST2017-04-22T00:11:25+5:302017-04-22T00:11:25+5:30

नागरी सेवा दिनाचे औचित्य : अधिकारी कर्मचा-यांची उपस्थिती.

'Honor' of outstanding officials | उत्कृष्ट अधिका-यांचा ‘सन्मान’

उत्कृष्ट अधिका-यांचा ‘सन्मान’

वाशिम : नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते या अधिकारी, कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. सन २0१६-१७ मध्ये उत्कृष्ट कामगिरीबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, कारंजाचे तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे, मालेगावचे तालुका कृषी अधिकारी एस. के. वाळके यांच्यासह रिसोड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी आर. पी. देशपांडे, अव्वल कारकून अनिल घोडे (महसूल), धनंजय कांबळे (गृह शाखा), लघु टंकलेखक वैभव कुलकर्णी, वाशिम तहसील कार्यालयाचे तलाठी अरुण कुकडकर, जिल्हा नियोजन कार्यालयाचे शिपाई सुनील धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन तहसीलदार रमेश जसवंत यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे प्रसारण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिल्ली येथे झालेल्या ११ व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्यात येत होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी नागरी सेवेतील अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना केलेले भाषण जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना स्क्रीनवर दाखविण्यात आले.

Web Title: 'Honor' of outstanding officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.