समता फाऊंडेशन कडून ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST2021-07-02T04:28:11+5:302021-07-02T04:28:11+5:30

कार्यक्रमात पुरुषोत्तम अग्रवाल यांच्यासह ब्रह्माकुमारी ज्योतीदीदी, प्रतिष्ठित व्यापारी उत्तमसेठ बगडिया, कृषितज्ज्ञ संजय उकळकर, संतोष वाघमारे, डॉ. अजय पाटील, दीपक ...

Honor of Brahmakumaris Vidyalaya from Samata Foundation | समता फाऊंडेशन कडून ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा सन्मान

समता फाऊंडेशन कडून ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा सन्मान

कार्यक्रमात पुरुषोत्तम अग्रवाल यांच्यासह ब्रह्माकुमारी ज्योतीदीदी, प्रतिष्ठित व्यापारी उत्तमसेठ बगडिया, कृषितज्ज्ञ संजय उकळकर, संतोष वाघमारे, डॉ. अजय पाटील, दीपक लोहिया, तान्हाजी गोंड आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी अगदी मोफत लस देण्याचा कार्यक्रम ५ जूनपासून शहरात समता फाऊंडेशनच्या पुढाकाराने व नगरपरिषद व सिटी केअर हॉस्पिटलच्या सहकार्याने राबविण्यात आला. यासाठी शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक संस्था व संघटनांनी संपूर्ण शहरात जनजागृतीची मोहीम राबविली. त्यामुळे शहरातील सतरा हजार लोकांचे लसीकरण केवळ २२ दिवसांत पूर्ण करण्याचा पराक्रम समता फाऊंडेशननी पूर्ण केला. या लसीकरण मोहिमेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे व्यक्तिशः ऋणनिर्देश व्यक्त करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करून पुरुषोत्तम अग्रवाल आपल्या समता फाऊंडेशनच्या चमूसह जाऊन विविध व्यक्ती, संस्था व संघटनांना सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत आहेत. त्यात २८ जूनला ब्रह्माकुमारीज विद्यालयातील ज्ञानार्थीशी संवाद साधून विद्यालयाच्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढून अग्रवाल यांनी भविष्यातही सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली तर दीदींनी समता फाऊंडेशनचे कार्य केवळ मानवी कल्याणसाठीच नव्हे तर सृष्टीच्या कल्याणार्थ समर्पित ईश्वरीय सेवा असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता फाऊंडेशनचे आरोग्य विभागप्रमुख तान्हाजी गोंड यांनी तर सूत्रसंचालन व आभार रवी अंभोरे यांनी मानले.

Web Title: Honor of Brahmakumaris Vidyalaya from Samata Foundation