गृह राज्यमंत्र्यांनी केली कापशी नदी पुनरुज्जीवन कामाची पाहणी

By Admin | Updated: May 26, 2017 20:04 IST2017-05-26T20:04:12+5:302017-05-26T20:04:12+5:30

वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील कापशी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जलसंधारण विभागाने हाती घेतले आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २६ मे रोजी या कामाला भेट देऊन पाहणी केली.

Home Minister of State reviewed Kapshi river revival work | गृह राज्यमंत्र्यांनी केली कापशी नदी पुनरुज्जीवन कामाची पाहणी

गृह राज्यमंत्र्यांनी केली कापशी नदी पुनरुज्जीवन कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील कापशी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जलसंधारण विभागाने हाती घेतले आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २६ मे रोजी या कामाला भेट देऊन पाहणी केली. 
याप्रसंगी कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, जलसंधारण विभागाचे श्री. मापारी, रवी भुसारी, कारंजाचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, डॉ. राजीव काळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  कापशी नदीचे सुमारे २ किलोमीटर पर्यंत रुंदीकरण व खोलीकरणचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुमारे ८०० टीसीएम पाणीसाठा निर्माण होईल. नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने आजूबाजूच्या शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. तसेच पुराचा धोकाही कमी होईल, अशी माहिती जलसंधारणचे  मापारी यांनी यावेळी दिली. गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Web Title: Home Minister of State reviewed Kapshi river revival work