शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

कोरोनामुळे ५० वर्षावरील होमगार्डला मिळेना ड्यूटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 10:54 AM

Home guards over 50 do not get duty due to corona : ५० वर्षांवरील नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे सांगून होमगार्डला बंदोबस्त दिला जात नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे ५० वर्षावरील होमगार्डला ड्यूटी, बंदोबस्तावर घेतले जात नसल्याने त्यांच्यासह कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. बंदोबस्तावर घेण्याची मागणी होमगार्डस् यांनी निवेदनाद्वारे ८ एप्रिल रोजी केली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. पोलिसांच्या दिमतीला होगगार्डदेखील घेतले जातात. ५० वर्षांवरील नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे सांगून होमगार्डला बंदोबस्त दिला जात नाही. शासनाच्या जाचक परिपत्रकामुळे ५० वर्षावरील होमगार्डला बंदोबस्तापासून वंचित राहावे लागत आहे, ५० वर्षावरील सर्व पुरुष व महिला होमगार्ड सैनिक हे गेल्या दीड वर्षापासून कोविड-१९ बंदोबस्त पासून वंचित ठेवल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या भयंकर संकटात हाताला काम नाही व शासनाच्या जाचक अटीमुळे बंदोबस्त नाही. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावेळी शासनाने मैदानी चाचणी घेतली. त्यामध्ये पुरुष व महिला होमगार्ड सैनिक पात्र झाले असून सुद्धा व कोविड-१९ लसीचा पहिला व दुसरा डोज घेऊन सुद्धा बंदोबस्त पासून वंचित ठेवले आहे, असे निवेदनात नमूद आहे. जाचक अट रद्द करून होमगार्ड सैनिकांना बंदोबस्त देण्याची मागणी होमगार्ड सैनिकांनी केली. निवेदनावर तानाजी गंगावणे,  सुभाष पवार,  गोविंदराव वानखेडे, मोहन कोकाटे, विनोद लव्हाळे, मोतीराम इंगळे, राजूसिंग चव्हाण, गजानन वानखेडे, भारत खडसे, नरेंद्र बगळे, प्रकाश  शेळके, गजानन भोपळे, रमेश जाधव, पुष्पलता डी.सावंत आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या