शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्युटी’साठी ‘होमगार्डस्’ आक्रमक; जिल्हा समादेशक कार्यालयास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:58 IST

वाशिम : सामाजिक उपक्रमात पोलिसांच्या बरोबरीने सेवा देणाºया जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या ३५० कर्मचाºयांची शारिरीक चाचणी घेवूनच पुर्ननियुक्ती देण्याची भुमिका प्रशासनाने घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजिक उपक्रमात पोलिसांच्या बरोबरीने सेवा देणाºया जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या ३५० कर्मचाºयांची शारिरीक चाचणी घेवूनच पुर्ननियुक्ती देण्याची भुमिका प्रशासनाने घेतली. यामुळे ‘ड्युटी’ मिळणार नसल्याच्या मुद्यावरून संतापलेल्या सर्व कर्मचाºयांनी एकत्र येवून जिल्हा समादेशक कार्यालयाला सोमवार, १८ फेब्रूवारी रोजी घेराव घातला. या आक्रमकतेपुढे अखेर प्रशासनाने नमते घेत कार्यरत गृहरक्षक दलाच्या कर्मचाºयांना ‘ड्युटी’ देण्याचे मान्य केले. गृहरक्षक दल हा पोलीस विभागाचा समकक्ष विभाग म्हणून शासनलेखी नोंद आहे. राज्याचा पोलीस महासंचालक दर्जाचा समादेशक गृहरक्षक दलावर निगराणी ठेवतो. असे असताना या विभागातील कर्मचाºयांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असून विविध स्वरूपातील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातही स्थानिक जिल्हा गृहरक्षक दलाच्या कार्यालयातील आघाव नामक लिपीकाने वरिष्ठांकडून गृहरक्षक दलातील सर्व कर्मचाºयांची शारिरीक चाचणी घेतल्यानंतरच पुर्ननियुक्ती देण्याचा आदेश असल्याचे सांगून सर्वांनाच ‘ड्युटी’ देण्याचे नाकारले. त्यामुळे संतापलेल्या गृहरक्षक दलाच्या कर्मचाºयांनी सोमवारी दुपारी आक्रमक पवित्रा अंगिकारत जिल्हा समादेशक कार्यालय गाठून प्रशासकीय अधिकारी व लिपीकास घेराव घातला. महिला कर्मचाºयांनीही यावेळी आक्रमक पाऊल उचलत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे धास्तावलेल्या लिपिकाने व जिल्हा समादेशकांनी नमती बाजू घेत सर्व कर्मचाºयांना ‘ड्युटी’ देण्याची बाब मान्य केली. यावर संबंधित गृहरक्षक दलाच्या कर्मचाºयांचे समाधान झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसagitationआंदोलन