रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे अनुदान लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST2021-04-25T04:40:28+5:302021-04-25T04:40:28+5:30

ग्रामीण भागात अनु. जाती प्रवर्गातील लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत गत दोन वर्षांत ...

Home grant under Ramai Awas Yojana on extension! | रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे अनुदान लांबणीवर !

रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे अनुदान लांबणीवर !

ग्रामीण भागात अनु. जाती प्रवर्गातील लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत गत दोन वर्षांत अनेक लाभार्थींनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. कोरोना विषाणूच्या संकटामुळे मध्यंतरी गाव परिसरात घरकुलांची बहुतांश कामे थांबली होती. ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत घरकुलांची कामे बऱ्यापैकी झाली. तेव्हा अनलॉकचा टप्पा सुरू होताच, अनेकांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. रेती, सिमेंट, लोखंड, मजुरीचा खर्च आदी सर्वांमध्ये वाढ झाली. महागाईची झळ सोसून उसनवारी, वेळप्रसंगी कर्ज काढून लाभार्थींनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. आज ना उद्या अनुदान मिळेल, या आशेवर अनेक महिने उलटले आहेत; तथापि, अद्याप अनुदान मिळाले नाही. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे पुन्हा मिनी लॉकडाऊन आहे. घरकूल बांधकामेही प्रभावित होत असून, कोरोनामुळे अनुदानही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Home grant under Ramai Awas Yojana on extension!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.