शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थी, शिक्षकांना हवी सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:20 IST

Online Education, Washim News प्रथम सत्र परीक्षा दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्यावर घेण्यात यावी, अशी विनंती शाळांना केली आहे.

वाशिम : कोरोनामुळे साधारणत: मे महिन्यापासून आॅनलाईन वर्ग सुरू आहेत. या दरम्यान कोणत्याही सण, उत्सवाच्या सुट्ट्या नसल्याने किमान दिवाळीची सुटी तरी देण्यात यावी, असा सूर शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मे महिन्यापासून अनेक खासगी शाळांनी आॅनलाइन वर्ग सुरू केले. सलग सहा महिने आॅनलाइन वर्ग सुरू आहेत. या सहा महिन्यांमध्ये कोणतीही मोठी सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. सकाळ, दुपार, सायंकाळ अशा तीन सत्रात विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. एरव्ही आॅफलाईन शिक्षण पद्धतीत सण, उत्सव काळात सुटी देण्यात येते. आॅनलाईन शिक्षण पद्धतीत मात्र सण, उत्सवादरम्यान मोठी सुटी देण्यात आली नसल्याने शिक्षकांसह पालक, विद्यार्थ्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. गणेशोत्सवदरम्यानही सुटी नव्हती. आता दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. दिवाळीदरम्यान १० ते १५ दिवसांची सुटी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक, विद्यार्थी, पालकांमधून होत आहे. अनेक शाळांनी आॅनलाइन प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर काही पालकांनी प्रथम सत्र परीक्षा दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्यावर घेण्यात यावी, अशी विनंती शाळांना केली आहे. मात्र शाळा वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे दिसून येते. गत सहा महिन्यांपासून आॅनलाईन वर्ग सुरू आहेत. सण, उत्सवादरम्यान या वर्गांना सुटी देणे गरजेचे आहे. दिवाळी सण लक्षात घेता आॅनलाईन वर्गाला सुटी देण्यात यावी.- गजानन तुर्केपालक, वाशिमयंदा आॅनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. शिक्षकदेखील आॅनलाईन, समुदाय पद्धतीने शिक्षण देत आहेत. दिवाळीदरम्यान आॅनलाईन वर्गाला किमान १५ दिवसाची सुटी मिळावी. - सतीश सांगळेशिक्षक वाशिम

 

 

 

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणonlineऑनलाइनexamपरीक्षा