महामार्ग रस्त्याची दुरावस्था

By Admin | Updated: July 8, 2014 22:52 IST2014-07-08T22:52:51+5:302014-07-08T22:52:51+5:30

कारंजा येथून जाणार्‍या नागपूर औरगांबाद हायवे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात जिवघेणी खड्डे असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Highway road erosion | महामार्ग रस्त्याची दुरावस्था

महामार्ग रस्त्याची दुरावस्था

कारंजा : कारंजा येथून जाणार्‍या नागपूर औरगांबाद हायवे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात जिवघेणी खड्डे असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे अशी मागणी नागरीकाकडून होत आहे. कारंजा मार्ग जाणारा औरंगाबाद नागपूर रस्त्यावर कारंजा परीसरातील धनज बु. रस्त्यावर रेल्वे गेटजवळ मोठय़ा प्रमाणात खड्डे असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याने धजन, भामदेवी, झोडगा, नारेगाव, विरगव्हान, आखतवाडा, मेहा, शहा, अजझमपूर, जयपुर आदी गावातील नागरीक व विद्यार्थी शेतकरी जा ये करतात. हायवे रस्त्यावर भिलखेडा चौफुली असल्यामुळे वाहणाची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरु राहते. या ठिकाणचे रेल्वे गेट सुध्दा तुटलेले आहे. शंकुतला रेल्वे येते त्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या ठिकाणी ऐवढा मोठा खड्डा निर्माण झाला आहे. की त्या रस्त्याच्या खड्डयात एखादे वाहण खड्यात फसले की काढणे कठिन होते. त्यामुळे या अपघात स्थळावरी असणारे जिवघेणी खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे अशी मागणी या परीसरातील नागरीकांकडून होत आहे.

Web Title: Highway road erosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.