‘हायमास्ट लाईट’ ठरताहेत शोभेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:37 IST2021-04-05T04:37:19+5:302021-04-05T04:37:19+5:30
मालेगाववरून शिरपूरमार्गे रिसोड-सेनगाव-हिंगोली या ४६१ ‘बी’ राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या अंतीम टप्प्यात आहे. या कामादरम्यान काही ठिकाणी ‘हायमास्ट लाईट ...

‘हायमास्ट लाईट’ ठरताहेत शोभेची वस्तू
मालेगाववरून शिरपूरमार्गे रिसोड-सेनगाव-हिंगोली या ४६१ ‘बी’ राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या अंतीम टप्प्यात आहे. या कामादरम्यान काही ठिकाणी ‘हायमास्ट लाईट टॉवर’ उभारण्यात आले आहेत. यामध्ये शिरपूर येथील रिसोड फाटा परिसरात जंक्शनस्थळी ऑक्टोबर २०२० मध्ये ‘हायमास्ट टॉवर’चे काम पूर्ण होऊन त्यावर लाईट सुद्धा लावण्यात आले. मात्र टॉवरवर लावलेले लाईट्स वीजजोडणीअभावी अद्यापपर्यंत सुरूच होऊ शकले नाही. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हायमास्ट लाईट सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे.
याबाबत अकोला राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता चौधरी यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता, लवकरच हायमास्ट लाईट सुरू करण्यात येतील, असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात येते. असे असले तरी हा प्रश्न सोडविण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून हायमास्ट लाईट केवळ शोभेची वस्तू म्हणून उभे केल्याचे दिसून येत आहे.
...................
कोट :
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा स्थानिक संस्थेकडून हायमास्ट लाईट च्या वीज जोडणीसाठी अद्यापपर्यंत आमच्याकडे रीतसर मागणी अर्ज करण्यात आलेला नाही. नियमांची पूर्तता केल्यास तात्काळ वीज जोडणी करून देण्यात येईल.
- अर्जुन जाधव
सहायक अभियंता, महावितरण कार्यालय, शिरपूर
................
कोट :
रिसोड फाटा परिसरात हायमास्ट टॉवरवरील लाईटसाठी वीज जोडणीकरीता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला ना हरकत प्रमाणपत्र नोव्हेंबर २०२० मध्येच देण्यात आले आहे. हा प्रश्न लवकरच निकाली निघण्याचे संकेत आहेत.
- भागवत भुरकाडे
ग्रामविकास अधिकारी, शिरपूर जैन