अहो, पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त; वाहन चालविणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:04+5:302021-07-30T04:43:04+5:30

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिक हैराण झाले आहेत. त्या तुलनेत विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी ...

Hey, jet fuel is cheaper than petrol-diesel; How to drive? | अहो, पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त; वाहन चालविणार कसे?

अहो, पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त; वाहन चालविणार कसे?

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिक हैराण झाले आहेत. त्या तुलनेत विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी विमानाच्या इंधनाचे दर १ टक्क्याने कमी झाले; तर पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यात कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला मर्यादा असल्याने अनेकांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. पेट्रोल, डिझेल महागल्याने वाहन चालवावे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

--------------

कोट :

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यात प्रवासी वाहतूक मर्यादित असल्याने स्वत:च्या वाहनाचा आधार घ्यावा लागतो; परंतु पेट्रोलचा खर्च वाढल्याने अडचणी येत आहेत.

- राजेश मोखडकर,

वाहनमालक

-----------

कोट :

पेट्रोल-डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. त्या तुलनेत विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०७ रुपयांवर पोहोचले असून, कोरोना काळात वाहनाचा वापर करावा लागत असल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे.

- श्रीकांत माने,

वाहनमालक

-----------

- हा बघा फरक! (दर प्रति लीटर)

विमानातील इंधन एटीएफ

६० रुपये

----

पेट्रोल

१०६ रुपये

---------

दररोज लागणारे पेट्रोल

२३,३४० लीटर

-----

शहरातील वाहनांची संख्या

- दुचाकी २३,१०९

- चार चाकी ३९२

कोरोनामुळे खर्चात भर, पाचशेच्या ठिकाणी हजार

१) कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. नोकरदार वर्गाला तालुक्यात प्रवास करण्यासाठी स्वत:चे वाहन वापरावे लागते. वर्षभरात पेट्रोलचे दर ३५ रुपयांनी वाढले आहेत.

२) ग्रामीण भागातील एसटीच्या बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे लहानसहान कामांसाठीही वाहनांचा वापर करावा लागत असून, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने खर्चात भर पडली आहे.

३) पूर्वी पेट्रोल स्वस्त असल्याने जिल्हांतर्गत विविध कामांसाठी वाहनांचा वापर केला तरी साधारत: पाचशे रुपये खर्च येत असे, आता पेट्रोल दर वाढले असताना वाहतूकही मर्यादित आहे. त्यामुळे जवळपास हजार रुपये खर्च येत आहे.

Web Title: Hey, jet fuel is cheaper than petrol-diesel; How to drive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.