गावकर्‍यांच्या सहकार्याने चोरटे पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: July 8, 2014 22:48 IST2014-07-08T22:48:41+5:302014-07-08T22:48:41+5:30

लोखंडी गेट चोरताना ८ जणांना गावकर्‍यांच्या सहकार्याने मुद्दे मालासह पोलीसांनी ८ जुलै रोजी ताब्यात घेतले.

With the help of villagers, the thieves of the police | गावकर्‍यांच्या सहकार्याने चोरटे पोलिसांच्या ताब्यात

गावकर्‍यांच्या सहकार्याने चोरटे पोलिसांच्या ताब्यात

कारंजालाड : तालुक्यातील वडगाव ईजारा येथील शेतकरी दशरथ पठाडे यांच्या शेताजवळील असलेल्या बंधारावरील लोखंडी गेट चोरताना ८ जणांना गावकर्‍यांच्या सहकार्याने मुद्दे मालासह पोलीसांनी ८ जुलै रोजी ताब्यात घेतले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव ईजारा येथील शेतकरी दशरथ पठाडे यांच्या शेताजवळील सरकारी बंधार्‍याचे १६ लोखंडी गेट किंमत ८0 हजार किंमतीचे चोरी करताना ८ जुलै रोजी ११ वाजताच्या दरम्यान आढळून आले. त्यानुसार गावकर्‍यांच्या लक्षात येताच गावकर्‍यांनी सतर्क होऊन पोलीसांना पाचारण करून पोलीसांनी आरोपी राहुल भिमराव ठाकरे, बंटी प्रेमनारायण विश्‍वकर्मा, इंदूकुमार दुर्गाप्रसाद देहरीया, श्याम हिरा बिनवरी रा.छिंदवाडा, सावेश पांडे रा.नागपूर, हरिजविनसिंग सुरजितसिंग अंद्रेले रा.कारंजा, गोपाल टोवा राठोड रा.छिंदवाडा, दिनेश मंगलसिंग बुंदेले रा.नागपूर या ८ आरोपीसह १६ नग लोखंडी गेट, टाटा गाडी क्र. एमएच ३१ सीबी-६७२८ यासह मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीस अटक करून अपराध क्र.१९९ /१४ कलम ३७९, ३४ नुसार फिर्यादी तारासिंग राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार व इतर पोलीस कर्मचारी करीत आहे.

Web Title: With the help of villagers, the thieves of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.