"जीएसटी" नोंदणीकरिता मदत केंद्र स्थापन!
By Admin | Updated: June 29, 2017 19:37 IST2017-06-29T19:37:27+5:302017-06-29T19:37:27+5:30
वाशिम : येथील विक्रीकर कार्यालयात जीएसटी नोंदणीकरिता मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक विक्रीकर आयुक्त डॉ. प्रतिक बी. राठोड यांनी केले आहे.

"जीएसटी" नोंदणीकरिता मदत केंद्र स्थापन!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील विक्रीकर कार्यालयात जीएसटी नोंदणीकरिता मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक विक्रीकर आयुक्त डॉ. प्रतिक बी. राठोड यांनी केले आहे.
जीएसटी नोंदणीकरिता स्थापन करण्यात आलेल्या मदत केंद्रामध्ये विक्रीकर अधिकारी प्रफुल कोल्हे, विक्रीकर निरीक्षक गणेश तळोकार, विक्रीकर सहाय्यक प्रदीप आरु यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे डॉ. राठोड यांनी कळविले .