अवजड वाहतूकबंदी कागदावरच!
By Admin | Updated: November 30, 2014 23:55 IST2014-11-30T23:55:46+5:302014-11-30T23:55:46+5:30
वाशिम शहरातील प्रकार: रस्तेच बनले पार्कींग झोन ,गर्दीच्या वेळी शहरात येतात मालाचे ट्रक.

अवजड वाहतूकबंदी कागदावरच!
शिखरचंद बागरेचा /वाशिम
स्थानिक जिल्हाप्रशासनाने गत वर्षीपासून वाशिम शहरात ऐन गर्दीच्या वेळी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंतच्या वेळेत शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीस व प्रवेशास बंदी घातलेल्या आहे. जिल्हाधिकार्यांनी तसे आदेश संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत तथापि, सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडे व्यावसायीक, मालवाहतुकीदार व संबंधित यंणा कानाडोळा करीत असल्यामुळे जिल्हाप्रशासनाने जारी केलेले आदेश केवळ कागदोपत्रीच राहीले असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील अकोला नाका ते पाटणी चौक मार्गे शिवाजी चौक व पोष्ट ऑफीस चौक ते आंबेडकर चौक पाटणीचौक, रिसोड नाकामार्गे लाखाळा, शिवाजी चौक ते बँकऑफ महाराष्ट्र समोरील चौक या प्रमुख रस्त्यांवर वाशिम शहरातील बहुतांश बाजारपेठ मार्केट आहे. जिल्हाधिकार्यांनी वाशिम शहरातील अकोला नाका ते शिवाजी चौक व पोष्टऑफीस चौक ते पारसप्लाझा या रस्त्यांवर सकाळी ९ ते रात्री ९ या काळात या रस्त्यावर अवजड वाहतुकीस व अवजड वाहनांना प्रवेशबंदी घातली होती.प्रारंभी तिचे काहीकाळपर्यंत काटेकोरपणे पालन करण्यात आले मात्र, नंतर या अवजडबंदी आदेशची अंमलबजावणी होणे थांबले आता शहरात केंव्हाही मालवाहतुकीची वाहने दुकानापुढे उभी करुन माल चढविणे उतरविणे सुरु केले जाते कुठेही ट्रक उभे केले जातात परिणामी, वाहतुकीची कोंडी होत असून यामध्ये नागरिकांचे कमालीचे हाल होत आहेत.