आठवड्यापासून पावसाची रिपरिप, खरीप पिकांना पुन्हा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST2021-08-22T04:44:21+5:302021-08-22T04:44:21+5:30

----------------- सहा दिवसात ७६ मि.मी. पाऊस जिल्ह्यात सोमवार १६ ऑगस्ट ते शनिवार २१ ऑगस्टदरम्यान सहा दिवसाच्या कालावधीत ७६ मि.मी. ...

Heavy rains for a week, kharif crops in danger again! | आठवड्यापासून पावसाची रिपरिप, खरीप पिकांना पुन्हा धोका!

आठवड्यापासून पावसाची रिपरिप, खरीप पिकांना पुन्हा धोका!

-----------------

सहा दिवसात ७६ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सोमवार १६ ऑगस्ट ते शनिवार २१ ऑगस्टदरम्यान सहा दिवसाच्या कालावधीत ७६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने ठाणच मांडले आहे. दोन तीन तासांची विश्रांती घेत पाऊस दरदिवशी सर्वत्र हजेरी लावत आहे. त्यामुुळेच पावसाच्या सरासरीतही मोठी वाढ झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

-----------------

पिकांच्या वाढीवर परिणाम

मागील सहा दिवसात भागात पाऊसमान जास्त झाल्याने शेतात पाणी साचत आहे. पाणी साचल्याने जमीन घट्ट होते तसेच पिकांच्या मुळाना जमिनीतून अपटेक (जमिनीतून उपलब्ध खताचे/अन्नद्रव्ये सेवन ) घेणे शक्य होत नाही. परिणामी पिकांची वाढ खुंटते व मूळ अतिपाण्यामुळे कुजून पिवळी पडतात. बुरशी वाढते. हीच परिस्थिती जास्त दिवस राहिल्यास पिके हाताची जायचा धोका संभवतो.

-----------

कोट: शेतात पाणी साचत असेल आणि निचरा व्यवस्थित होत नसेल, तर शेतकऱ्यांनी साचलेले पाणी बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी शेतात चर खोदावेत किंवा उपसून बाहेर काढावे. पिकांत हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Heavy rains for a week, kharif crops in danger again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.