वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस
By Admin | Updated: July 12, 2014 02:11 IST2014-07-12T02:06:53+5:302014-07-12T02:11:45+5:30
रात्रीदरम्यान वाशिममध्ये पाऊस

वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस
वाशिम : यंदा मृग नक्षत्रापासूनच जिल्हावासीयांवर कोपलेला वरुणराजा ११ जुलैला मेहेरबान झाला. वाशिममध्ये रात्री ८ वाजताच्या सुमारास सुरू झालेला धो-धो पाऊस रात्री ९.३0 वाजेपर्यंत सुरूच होता. पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशांनीच पेरणी केली होती; परंतु ती पिकेही पाण्याअभावी सुकू लागली होती. ११ जुलैला झालेला पाऊस या पिकांना संजीवनी ठरला असल्याच्या प्रतिक्रया शेतकर्यांमधून व्यक्त होत असून, आता जिल्हाभरात पेरण्यांची लगबग सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. कारंजातही ११ जुलैला दमदार पाऊस बरसला.