जड झाले ओझे अ पे क्षां चे

By Admin | Updated: July 30, 2014 00:50 IST2014-07-30T00:21:44+5:302014-07-30T00:50:10+5:30

पालकांना फिरायला घेऊन जाणारे पालकही दुर्मिळच दिसून येत आहे. लोकमतच्या सर्व्हेक्षणातून ही बाब प्रकर्षाने दिसून आली आहे.

Heavy burden of burden | जड झाले ओझे अ पे क्षां चे

जड झाले ओझे अ पे क्षां चे

वाशिम: इवल्या पावलांनी शाळेत पहिले पाऊल ठेवले..नवी अंगणवाडी.. नवी शाळा.. नवी इमारत..नवे सवंगडी..नवाच उत्साह.. अन् नवेच गुरूजीही. नव्यांच्या या नवलाईत सुरूवातील लेकरं कावरले..बावरलेही.. पण आता चेहर्‍यावरची भिती आनंदात बदलत चालली आहे..त्यांचं मन आता रमायलं लागलं आहे..सकाळी नऊ वाजेपर्यंत अंथरूणात खुशाल लोळणारे चिमुकले आता सात वाजताच सुटाबुटात रेडी झालेले दिसून येतात..पाठीवर असते ते न पेलणारे दप्तरांचे ओझै. अंगणवाडीच्या बालकांचे हे प्रातिनिधीक चित्र असले तरी, दहावी पर्यंत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची परिस्थिती काहीशी अशीच असते. सकाळी शाळा.. दुपारी शिकवणी..संध्याकाळी अभ्यास अन् वेळ मिळालाच तर टिव्ही वरील कार्टूण..सतत बिझी असलेल्या विद्यार्थ्यांना व्यायाम, खेळ व पर्यटन आदी बाबींसाठी खूपच कमी वेळ मिळतो. किंबहूणा आठवड्यातून एखादा दिवस..पालकांच्या अपेक्षा पेलवतांना विद्यार्थ्यांची अक्षरश: तारांबळ उडते. पालकांना विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला , त्यांच्या शिक्षकांशी भेटायला, वेळ नाही. पालकांना फिरायला घेऊन जाणारे पालकही दुर्मिळच दिसून येत आहे. लोकमतच्या सर्व्हेक्षणातून ही बाब प्रकर्षाने दिसून आली आहे.

.सर्व्हेक्षणात लोकमतने काही पालकांकडुन एक प्रश्नावली भरून घैतली. त्यात ३६ पालकांची पाल्ये अंगणवाडीत २0 पालकांची पाल्ये प्राथमिक तर ४४ पालकांची पाल्ये माध्यमिक शाळेत शिक्षण घेतात. पाल्य शाळेत जाताना प्रसन्न मुद्रेने जातो का? , असे विचारले असता ६२ पालकांनी होय, २२ जणांनी नाही तर १६ पालकांनी कधीकधी असे उत्तर दिले. पाल्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायला तब्बल ६५ टक्के पालकांना वेळच नसल्याचे सर्व्होक्षणात आढळून आले आहे. केवळ २८ टक्के पालक विद्यार्थ्यांशी शाळेबाबत हितगुज करतात. तर १२ टक्के पालकच पाल्यांच्या अडीअडचणी व शालेय प्रगतीबाबत शिक्षकांशी चर्चा करतात. ५६ टक्के पालक आपल्या मुलाला दोन तासापेक्षा अधिक काळ टिव्ही समोर बसु देत नाहीत. तर १२ टक्के पालक असे आहेत जे पाल्यांना टिव्हीच पाहू शकत नाहीत. मुलांना खेळण्याचे स्वातंत्र्य देण्याबाबत पालकांची उदासिनता या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. खेळात वेळ गेल्यास त्याचा अभ्यासाच्या वेळेवर परिणाम होईल असाही काही पाकलांचा गोड गैरसमज असल्याचे दिसून आले. पाल्योंच्या शालेय प्रगतीबाबत ६0 टक्के पालक समाधानी दिसून येत नाहीत. मुलांना घेऊन पिकनिकला जाणार्‍या पालकांचे प्रमाणही नगण्यच आहेत्र

**
उच्च शिक्षित मंडळीपासून तर व्यापारी, शेतकरी, व अगदी मोलमजुरी करून उपजिविका भागविणार्‍या पाल्यांची मते नोंदविण्यात आली . सर्वांनी आपल्या पाल्यांच्या उज्‍जवल भवितव्याची स्पने रंगविली आहेत. स्वप्ने साकार करण्यासाठी विद्यार्थी, पालकांची कठोर मेहनतही सुरू आहे. पण, पालकांच्या दडपणाखाली विद्यार्थी वावरत आहेत. त्यांना तणावमुक्त शिक्षण देण्याची तर गरज आहेच. शिवाय पुस्तकात मुंडके, खुपसवून बसण्याऐवजी मैदानी खेळातही त्यांना कौशल्य विकसीत करण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक बनले आहे. त्याशिवाय आपल्या पाल्यांचा निभाव लाभणार नाही..

Web Title: Heavy burden of burden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.