शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचे मुख्याध्यापक झाले ‘आॅनलाईन कारकून’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:35 IST

  वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे.

ठळक मुद्दे शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत.९० टक्के शाळांमध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’सह इतर तत्सम सुविधांचा अभाव असल्याने आॅनलाईन स्वरूपातील सर्व कामे शहरातील एखाद्या ‘सायबर कॅफे’वर बसून करावी लागतात. दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे.

 वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे. याशिवाय डोक्यावर सततचा ताण राहत असल्याने त्यांच्यातून दबक्या आवाजात शासनाच्या धोरणाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शाळांसाठी पाठविला जाणारा पोषण आहार मोजून त्यांचे ‘रेकॉर्ड’ ठेवणे, त्याचा अहवाल शासनाकडे न चुकता वेळेत पाठविणे, विविध स्वरूपातील टपाल स्विकारणे आणि पाठविणे, इंटरनेटवरून विविध संकेतस्थळांवर शाळांची माहिती ‘अपलोड’ करणे यासह जिल्हा कोषागाराकडून थेट मुख्याध्यापकांच्या खात्यात शिक्षकांचा व्यवसायकर, गटविमा, एलआयसी, पतसंस्था कर्ज, बँकांचे कर्ज, सण अग्रीम, गृहकर्ज आदींची रक्कम वळती केली जात असल्याने यासंदर्भातील धनादेश त्या-त्या घटकाकडे सुपूर्द करणे आणि त्याचे ‘रेकॉर्ड’ ठेवणे, दर महिन्याला शिक्षकांचे पगारपत्रक तयार करून ते शालार्थ प्रणालीअंतर्गत ‘अपलोड’ करणे, अशी सर्व कामे मुख्याध्यापकांकडेच सोपविण्यात आलेली आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यातील ९० टक्के शाळांमध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’सह इतर तत्सम सुविधांचा अभाव असल्याने आॅनलाईन स्वरूपातील सर्व कामे शहरातील एखाद्या ‘सायबर कॅफे’वर बसून करावी लागतात. यासाठी लागणाºया खर्चाचीही विशेष तरतूद नसल्यामुळे सर्वच शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘आॅनलाईन’ प्रणाली अंमलात येण्यापूर्वी शिक्षकांच्या पगारीसह इतर सर्व कामे ‘आॅफलाईन’ असताना त्या-त्या तालुक्यांमधील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे होती; परंतू सद्या या सर्व कामांना मुख्याध्यापकांनाच न्याय द्यावा लागत असून त्यांचा बहुतांश वेळ या कामांमध्येच जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शिकविण्याकडेही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.  

कुठलाही मुख्याध्यापक हा त्या शाळेचा मुख्य अध्यापक असतो. मात्र, सद्य:स्थितीत सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना शासनाने अक्षरश: आॅनलाईन कारकून केले असून जास्तीत जास्त कामे त्यांनाच करावी लागत आहे. त्यापेक्षा पुर्वीप्रमाणे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ही कामे सोपविल्यास मुख्याध्यापकांसोबतच शिक्षकांनाही फायदेशीर ठरेल. यासाठी संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे आवाज उठविला जाईल.- मंचकराव तायडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिकTeacherशिक्षक