वाशिम जिल्ह्यात बालस्वच्छता मोहिमेचा ‘श्रीगणेशा’
By Admin | Updated: November 15, 2014 01:03 IST2014-11-15T01:03:16+5:302014-11-15T01:03:16+5:30
काटा येथे बाल मेळावा: गावातून निघाली स्वच्छता रॅली, मान्यवरांची उपस्थिती

वाशिम जिल्ह्यात बालस्वच्छता मोहिमेचा ‘श्रीगणेशा’
वाशिम : शाळांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्यभरात १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणार्या बालस्वच्छता मोहिमेचा १४ नोव्हेंबरला श्रीगणेशा करण्यात आला. काटा येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातून स्वच्छता रॅली व बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनो, आता तुम्ही स्वच्छतादूत बना आणि घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोचवा. आपली शाळा, घर स्वच्छ ठेवा, असा संदेश जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना दिला. वाशिम पंचायत समितीचे सभापती वीरेंद्र देशमुख, वाशिमचे तहसीलदार आशीष बिजवल, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवाद आदींची यावेळी उपस्थिती होती. संचालन जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे यांनी केले.