शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षा पीपीई किटमुळेच आरोग्य कर्मचारी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 11:49 IST

Health workers were annoyed by the PPE kit : किटचा वापर त्रासदायक झाल्याने कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षा या किटलाच आरोग्य कर्मचारी वैतागल्याचे दिसत आहे.

वाशिम: कोरोनाबाधितांवर उपचार करतानाच कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाकडून पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) पुरविल्या जात आहेत. तथापि, पूर्वीच्या तुलनेत या किट निकृष्ट असून, उन्हामुळे या किटचा वापर त्रासदायक झाल्याने कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षा या किटलाच आरोग्य कर्मचारी वैतागल्याचे दिसत आहे.जिल्हा रुग्णालयासह इतर सर्वच कोरोना रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी पीपीई किटचा वापर करतात. सुरुवातीच्या काळात या किट दर्जेदार असल्याने त्या वापरताना त्रास होत नव्हता; परंतु आता राज्यस्तरावरून पुरविल्या जाणाऱ्या किट निकृष्ट दर्जाच्या आहेत. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत असताना ही किट अंगात घालताच पुढच्या पाच मिनिटांत व्यक्ती घामाघूम होऊन जातो. प्लास्टिक स्वरुपाच्या या किट सहा तास अंगात ठेवून कर्तव्य बजावणारे कर्मचारी पुरते वैतागले आहेत. या किटमधून शरीराला हवाच लागत नसल्याने अंगातून घामाच्या धारा निघत असून, बुटातही मोठी घाण साचत आहे. त्यामुळे या किट वापरण्याबाबत कर्मचारी उदासीन दिसत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी त्यांचे नाव न छापण्याच्या अटीवर पीपीई किटमुळे होणारा त्रास सांगितला; ही किट घालण्यापेक्षा दोन शर्ट आणि दोन पँट, ग्लोव्हज आणि मास्क बरे वाटेल. कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशी खेळती हवाही नाही. कक्षात रुग्णांची माहिती घेताना ही किट घालून फिरलो तरी घामाने पूर्ण अंग भिजते. -आरोग्य कर्मचारी

गर्मी खूप वाढली आहे. त्यात किट दर्जेदार नाहीत. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून हे घालण्याची सक्ती आहे; परंतु आता कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षा या किटचाच अधिक वैताग आला आहे. -आरोग्य कर्मचारी

आम्हाला कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई किट घालाव्या लागतात; परंतु या किटमुळे अधिकच त्रास होत आहे. अंग घामाने भिजल्याने सतत खाज सुटते मग किट काढून टाकावीशी वाटते. यापेक्षा केवळ मास्क आणि ग्लोव्हज बरे राहतील.-आरोग्य कर्मचारी

कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्यांसह कक्षातील व्यक्तींना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई किट वापराव्या लागतात. या किटचा दर्जा चांगला नसेल, तर वरिष्ठस्तरावर तसे कळवून दर्जा सुधारण्याची मागणी करू. -डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या