कुंभी आरोग्य उपकेंद्रांतर्गत आरोग्य सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:29+5:302021-03-13T05:15:29+5:30
आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कूंभी आरोग्य उपकेंद्राच्या हद्दीतील गावांत गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ...

कुंभी आरोग्य उपकेंद्रांतर्गत आरोग्य सर्वेक्षण
आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कूंभी आरोग्य उपकेंद्राच्या हद्दीतील गावांत गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या चमूने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाच्या चमूकडून उपकेंद्रांतर्गत गावागावांत आरोग्य सर्वेक्षण करण्यासह ग्रामस्थांना कोरोना संसर्गापासून बचावासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे, नाकातोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात असून, ग्रामस्थांची कोरोना चाचणीही सुरू केली आहे. यात बुधवारपर्यंत परिसरातील १२७ ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यात २७ जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. या आरोग्य विभागाच्या चमूत कुंभी आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पराग सरनाईक, आरोग्य सेविका सुजाता राठोड, आशा सेविका मंदा ईळे, पंचफुला चव्हाण, पार्वती नागुलकर, सुनीता राठोड, सुनीता राठोड, सागरबाई राठोड, मदतनीस सुंदरबाई वाघमारे, आरोग्य सहायक शेख यांचा समावेश आहे.
===Photopath===
110321\11wsm_3_11032021_35.jpg
===Caption===
१२७ जणांची कोरोना चाचणी: २७ कोरोना बाधित