तहसीलदारांकडून आरोग्याचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST2021-05-18T04:43:12+5:302021-05-18T04:43:12+5:30
०००० रिसोडच्या भाजीबाजारात उसळली गर्दी (फोटो) रिसोड : कडक निर्बंधामधून भाजीपाला, किराणा, डेअरी आदींना सकाळी ७ ते ११ या ...

तहसीलदारांकडून आरोग्याचा आढावा
००००
रिसोडच्या भाजीबाजारात उसळली गर्दी (फोटो)
रिसोड : कडक निर्बंधामधून भाजीपाला, किराणा, डेअरी आदींना सकाळी ७ ते ११ या वेळेत सूट मिळताच रिसोड येथील भाजीबाजारात एकच गर्दी झाल्याचे सोमवार, १७ मे रोजी दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी कशी तुटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
०००००
कोठारी येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथील ६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १७ मे रोजी पॉझिटिव्ह आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली आहे. एकाच दिवशी ६ कोरोना रुग्ण आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
०००
सौरपंप योजनेचा लाभ देण्याची मागणी
वाशिम : सिंचनासाठी सौरपंपाची जोड मिळावी याकरिता कृषी सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. काही तांत्रिक कारणामुळे या योजनेत मालेगाव तालुक्याचा समावेश झाला नाही. मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी जि.प. सदस्य शाम बढे यांनी सोमवारी केली.
०००००