वडजी येथे आरोग्य मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST2021-07-26T04:37:32+5:302021-07-26T04:37:32+5:30
००००० शौचालय वापराकडे दुर्लक्ष वाशिम : जऊळका रेल्वे परिसरात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनेकांना शौचालय उभारून देण्यात आले; मात्र त्याकडे ...

वडजी येथे आरोग्य मार्गदर्शन
०००००
शौचालय वापराकडे दुर्लक्ष
वाशिम : जऊळका रेल्वे परिसरात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनेकांना शौचालय उभारून देण्यात आले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर शौचवारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
०००
दलित वस्ती योजनेची कामे अपूर्ण
वाशिम : भर जहागीर, वारला, जउळका रेल्वे आदी जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतची कामे अपूर्ण आहेत. सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, जलकुंभ आदी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी शनिवारी केली.
००
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या काही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पदे रिक्त असल्यामुळे सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.