उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली

By Admin | Updated: January 27, 2016 23:26 IST2016-01-27T23:26:46+5:302016-01-27T23:26:46+5:30

नाभिक समाजाच्या सात युवकांचे २५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न बेमुदत उपोषण.

The health of the fast bowlers decreased | उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली

उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली

वाशिम : छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक राहिलेल्या वीर जीवाजी महाले यांच्या प्रतापगड येथील प्रस्तावित स्मारक बांधकामाच्या भूमिपूजनास दिरंगाई होत आहे. या अन्यायाविरोधात नाभिक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात जणांनी २५ जानेवारीपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण सुरु केले. तिसर्‍या दिवशी दोघांची प्रकृती खालावली. रिसोड येथील पांडुरंग वाघमारे, गजानन राऊत, अनिल पंडित, जगदीश आळणे, विष्णु पोफळे, प्रकाश गाडेकर, गजानन गाडेकर या सात जणांनी स्मारक बांधकामाच्या भूमिपूजनास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत अर्धनग्न उपोषण सुरू केले. तिसर्‍या दिवशी अनिल पंडित, गजानन राऊत यांची प्रकृती खालावली. या उपोषणाला शिवसंग्राम, संभाजी ब्रिगेड, भारिप-बमसं, भिम टायगर सेना आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.

केशकर्तनालयाची दुकाने आज बंद
वीर जीवाजी महाले यांच्या प्रतापगड येथील प्रस्तावित स्मारक बांधकामाच्या भूमिपूजनास दिरंगाई होत नसल्याच्या निषेधार्थ २८ जानेवारीला जिल्ह्यातील केशकर्तनालयाची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय नाभिक समाजबांधवांनी घेतला.

Web Title: The health of the fast bowlers decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.