उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली
By Admin | Updated: January 25, 2016 02:11 IST2016-01-25T02:11:42+5:302016-01-25T02:11:42+5:30
रिसोड तालुक्यातील लाभार्थ्यांंचे २२ जानेवारीपासून सुरू होते उपोषण.

उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली
वाशिम : घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथील लाभार्थींंनी २२ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. उपोषणाच्या तिसर्या दिवशी तीन महिला उपोषणकर्त्यांंंची प्रकृती खालावली असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. जागेचा आठ अ नसल्याने रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथील ४0 लाभार्थींंना घरकुलापासून वंचित राहावे लागले. घरकुल मंजूर झालेल्या अनुसुचित जातीकरिता एफ क्लास गट क्रमांक ४७३, ४८0, ४८१ जमीन वाढीव गावठाण मंजुर करुन जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी यापूर्वी तहसीलदार, जिल्हाधिकार्यांकडे गावकर्यांनी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या मागणीची प्रशासनाने दखल घेतली नाही. ग्रामपंचायतने गावठाण वाढीसाठी सर्व कागदपत्रे व ग्रामसभेच्या ठरावासह सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वीच सादर केला. परंतु आजपर्यंंंत गावठाण वाढीबाबत व मागासवर्गीयांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध होण्याबाबत कार्यवाही झालेली नाही. घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी गोवर्धन येथील ४0 ते ५0 नागरिक उपोषणाला बसले. तिसर्या दिवशी तीन जणांची प्रकृती खालावली असतानाही कुण्या अधिकार्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन औदार्य दाखविले नाही. तीन महिलांवर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.