आरोग्य विभागाचे छत कोसळण्याच्या मार्गावर !

By Admin | Updated: May 31, 2014 00:50 IST2014-05-31T00:19:11+5:302014-05-31T00:50:50+5:30

कारंजालाड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सिलिंग कोसळण्याच्या मार्गावर आहे.

The Health Department's roof collapsing! | आरोग्य विभागाचे छत कोसळण्याच्या मार्गावर !

आरोग्य विभागाचे छत कोसळण्याच्या मार्गावर !

कारंजालाड : येथील पंचायत समितीमधील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सिलिंग कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सदर कार्यालयात काम करणार्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. स्थानिक आरोग्य अधिकारी कार्यालयातील छताचा काही भाग पूर्वीच कोसळलेला आहे. उर्वरित भागही अत्यंत मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे कार्यालयात काम करणार्‍या आठही कर्मचार्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. याशिवाय कार्यालयात संगणक, झेरॉक्स मशिन, शीतसाखळी, पंखे आदी महागड्या वस्तूही आहेत. त्यामुळे मोडकळीस आलेले छत कोसळल्यास जीवितहानी व मोठय़ा प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी वारंवार संपर्क करून छताची दुरूस्ती करावी अशी मागणी केली.

Web Title: The Health Department's roof collapsing!