कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आराेग्य विभाग सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:56+5:302021-08-01T04:37:56+5:30
लसीकरण मोहीम ‘मिशन मोड’वर राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या हाेत्या. त्यानुसार कोरोना प्रतिबंधक ...

कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आराेग्य विभाग सज्ज
लसीकरण मोहीम ‘मिशन मोड’वर राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या हाेत्या. त्यानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे सांगितले हाेते. आराेग्य विभागाकडून गावागावात नागरिकांना लसीचे महत्त्व व लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले जात आहे. याकरिता तलाठी, ग्रामसेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांत जनजागृती करीत असताना दिसून येत आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवून पात्र व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी ज्या भागात कमी लसीकरण झाले आहे, त्याठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढविण्यासंदर्भात नियाेजन करण्यात येत आहे.
काेराेनावर प्रभावी उपचार म्हणजे काेराेना लस हाेय. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन आपले व आपल्या कुटुंबीयाला काेराेनापासून दूर ठेवावे. लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्या.
- डाॅ. मधुकर राठाेड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम