‘स्वाइन फ्लू’साठी आरोग्य विभाग सतर्क
By Admin | Updated: March 15, 2015 01:05 IST2015-03-15T01:05:59+5:302015-03-15T01:05:59+5:30
२४ तास कर्मचारी; दहा बेडच्या वार्डची निर्मिती.

‘स्वाइन फ्लू’साठी आरोग्य विभाग सतर्क
वाशिम : नागपूर, अमरावती शहरापाठोपाठ येथील देवपेठ परिसरात वास्तव्यास असलेला एका गरोदर महिलेला स्वाइन फ्लू ची लागण झाल्याने संपूर्ण जिल्हय़ात खळबळ उडाली असून, आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांनी २४ तास आरोग्य सेवा देण्यात येईल, अशी उपाय योजना केली आहे. विषम तापमानामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक वाढलेली थंडी, ढगाळी वातावरण, त्यानंतर तापमानात झालेली वाढ हा बदल एच-वन आणि एन-वन या स्वाइन फ्लू विषाणूसाठी पोषक ठरणारा आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या प्रसाराबाबत दक्षता घेतली जात आहे. स्वाइन फ्लू झालेल्या महिलेच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये प्रथमदर्शनी ह्यस्वाइन फ्लूह्ण असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकार्याने संशयीत महिलेच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले. या तपासणीमध्ये गरोदर महिलेला ह्यस्वाइन फ्लूह्ण असल्याचा पॉझीटीव्हह्ण अहवाल अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाला १२ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला, याची माहिती जिल्हय़ाभरात पसरून लोकांनी धास्ती घेतली. याबाबत आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात येत असून, मार्गदर्शक सूचनाही केल्या जात आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणे गरजेचे आहे. काळजी घेतल्यास त्यापासून संरक्षण मिळू शकते, अशी माहिती दिली. सर्दी-पडसा, ताप, अंगदुखी, घशात खवखव अशीच लक्षणे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये आढळतात. त्यामुळे प्रथमदर्शनी हा आजार सहज ओळखता येत नाही. त्याकरिता रुग्णांनी तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहेत.