तीन हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST2021-04-25T04:40:35+5:302021-04-25T04:40:35+5:30
००० कवठा आरोग्य केंद्रातील पदे रिक्त वाशिम : रिसोड तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची काही पदे ...

तीन हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
०००
कवठा आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : रिसोड तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रिक्त पदे भरण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
00
प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षाच
वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान अद्याप दिले नाही. प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली. राज्य शासनाने घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
000
नागठाणा येथे आणखी १७ कोरोना रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील नागठाणा येथे आणखी १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण २४ एप्रिल रोजी आढळून आले. यापूर्वीदेखील नागठाणा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
00
शिरपूरच्या बाजारपेठेत गर्दी ओसरली
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिरपूर येथील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी ओसरली असल्याचे शनिवारी दिसून आले. नागरिकांनी मास्क किंवा रुमालाचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००००
अनसिंग परिसरात अवैध वृृक्षतोड
वाशिम : केनवड परिसरात आडजात वृक्षांची विनापरवाना कत्तल होत आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर वनतस्करांकडून कुऱ्हाड चालविली जात आहे.
0000
सौर पंप योजनेतून मेडशीला डच्चू
वाशिम : सिंचनासाठी सौरपंपाची जोड मिळाली याकरिता कृषी सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे या योजनेत मालेगाव तालुक्याचा समावेश झाला नाही. त्यामुळे या योजनेपासून मेडशी परिसरातील शेतकरी वंचित राहत आहेत.
००००
विनामास्क आढळून आल्याने कारवाई
वाशिम : दुचाकीवर विनामास्क आढळून येणाऱ्या ३० जणांवर शनिवारी शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहनचालकांनी मास्क किंवा रुमालचा वापर करावा, अशा सूचना दिलेल्या आहेत.
००००
रोहयोंतर्गतची कामे अपूर्ण
वाशिम : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गतची शिरपूर परिसरात अनेक कामे अर्धवट आहेत. मजुरांना कामे उपलब्ध व्हावी म्हणून अर्धवट असलेली कामे सुरू करावी, अशी मागणी मजुरांनी केली.
00
किन्हीराजा येथे आणखी दोन रुग्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांची तपासणी करीत कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
000०००००००००००००००००००००००००
00
डव्हा येथे जनजागृती
वाशिम : डव्हा, ता. मालेगाव येथे आणखी चार जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. कोरोनाबाबत ग्रामपंचायतींद्वारे जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले.
00
तामसी येथे पाच कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम : आरोग्य विभागातर्फे २४ एप्रिल रोजी प्राप्त अहवालानुसार तामसी येथे आणखी पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी सुरू केली.