रिठद परिसरात आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST2021-03-23T04:43:37+5:302021-03-23T04:43:37+5:30

अनसिंग येेथे काेराेना चाचणीसाठी गर्दी वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात काेराेना चाचणी करण्यात येत आहे. त्या ...

Health check up in Rithad area | रिठद परिसरात आरोग्य तपासणी

रिठद परिसरात आरोग्य तपासणी

अनसिंग येेथे काेराेना चाचणीसाठी गर्दी

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात काेराेना चाचणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अनसिंग येथेही काेराेना चाचणी करण्यात येत असून चाचणी केंद्रावर ग्रामस्थांची एकच गर्दी हाेताना दिसून येत आहे.

तोंडगाव येथे ग्रामस्थ घेताहेत खबरदारी

वाशिम : तालुक्यातील तोंडगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. ताेडगाववासी खबरदारी म्हणून मास्कचा वापर करुन गर्दी टाळत असल्याचे दिसून येत आहे.

अवैध धंद्यांवर पोलिसांचा ‘वॉच’

वाशिम : वरली-मटका, जुगाराच्या अड्ड्यांवर शौकिनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी कारवाई केली असून पोलिसांनी विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले आहे. नुकतेच कारंजा येथे दीड लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली.

Web Title: Health check up in Rithad area