सोमनाथ नगर येथे आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST2021-09-27T04:46:00+5:302021-09-27T04:46:00+5:30
सोमनाथ नगर येथील शिबिरात कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गव्हा, सोमठाणा, सोमनाथ नगर, देवठाणा, तळप, वाटोड या गावातील ...

सोमनाथ नगर येथे आरोग्य शिबिर
सोमनाथ नगर येथील शिबिरात कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गव्हा, सोमठाणा, सोमनाथ नगर, देवठाणा, तळप, वाटोड या गावातील गरोदर माता ४८,बालक ३८,नवजात शिशू ६ आदिंची तपासणी करण्यात आली. काही गरोदर महिलाना सोनोग्राफीकरिता पाठविण्यात आले, तसेच वय वर्षे १८ वरील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोज देण्यात आला. या लसीकरणाचा ११० नागरिकांना लाभ देण्यात आला. डॉ. शाम जाधव स्त्री रोग तज्ज्ञ, डॉ. जाधव बाल रोग तज्ज्ञ, डॅॉ. ठाकूर, डॉ. एस. आर. कानडे. पर्यवेक्षिका झाटे यांनी तपासणी करून आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटप्रवतक,आरोग्य सेवक ढोले,आरोग्य सेवक बांगर,आरोग्य सेविका मोनाली तेलंग, आरोग्य सेवक राठोड, आशा वर्कर शिला लोखंडे,जाधव बाई देवठाण,चव्हाण बाई सोमनाथ नगर, नामदेव चव्हाण, मुख्याध्यापक भगत , गावंडे यांनी परिश्रम घेतले