अनियमिततेची नगराध्यक्षांनी मागितली माहिती
By Admin | Updated: February 6, 2015 02:22 IST2015-02-06T02:06:23+5:302015-02-06T02:22:45+5:30
रिसोड नगर परिषद कर विभाग: कर्मचा-यांचे धाबे दणाणले.

अनियमिततेची नगराध्यक्षांनी मागितली माहिती
रिसोड (वाशिम) : येथील नगर परिषदेच्या कर विभागात दिवसागणिक आर्थिक अपहार समोर येत असल्याने कर विभागातील लाखोंचा घोटाळय़ाने शहरातील मालमत्ताधारक धास्तावले आहेत. कर विभागातील आर्थिक गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा प्रतिभा उल्हास झडपे यांनी मुख्याधिकारी यांना कर विभागातील आर्थिक अपहाराची इत्यंभूत माहिती लेखी स्वरूपात मागितल्याने या घोटाळय़ात सहभागी असलेल्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे. नगराध्यक्ष यांनी मुख्याधिकार्यांना एका पत्राद्वारे कर विभागासह शहरातील नागरिक मालमत्ता कराचा भरणा कर संग्राहकाकडे करतात. सदर कराचा भरणा झाल्यानंतर दुसर्या दिवशी कर संग्राहक हे सहाय्यक कर निरीक्षकाकडे सदर रक्कम जमा करतात. दरम्यान, सहाय्यक कर निरीक्षक हे दैनंदिन संग्राहकाचे पावती पुस्तक तपासून त्याची चलान स्वीकारतात.
यानंतर रोखपालाकडे सर्व कर संग्राहकांची एकत्रित चलान करून जमा करतात, अशी प्रचलित पद्धत आहे; परंतु गत काही महिन्यांपपासून कर संग्राहक हे सहाय्यक कर निरीक्षक यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा अपहार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय या अपहारामध्ये कोणकोणते कर संग्राहक, कर्मचार्यांवर कोणती कार्यवाही प्रस्तावित केली आहे, अपहाराबाबत सहाय्यक कर निरीक्षक यांची विभाग प्रमुख या नात्याने काय भूमिका आहे, सहाय्यक कर निरीक्षक यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कोणती कार्यवाही प्रस्तावित केली अशा प्रश्नांची उत्तरे मुख्याधिकारी यांना मागितली आहे. दिलेल्या पत्राची प्रत जिल्हाधिकारी वाशिम यांनासुद्धा पाठविण्यात आली आहे.