हराळचे खेळाडू राष्ट्रीयस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST2021-09-22T04:45:59+5:302021-09-22T04:45:59+5:30

या स्पर्धेत देशभरातून विविध राज्य संघ सहभागी होणार आहेत. विदर्भ संघसुद्धा या स्पर्धेत सहभागी होत असून, या संघात नागपूर, ...

Haral players nationally | हराळचे खेळाडू राष्ट्रीयस्तरावर

हराळचे खेळाडू राष्ट्रीयस्तरावर

या स्पर्धेत देशभरातून विविध राज्य संघ सहभागी होणार आहेत. विदर्भ संघसुद्धा या स्पर्धेत सहभागी होत असून, या संघात नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथील खेळाडू व श्री शिवाजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय हराळ, ता. रिसोड येथील तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दर्शन कळासरे, यश नरवाडे, ओवेश घनकर या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडा अधिकारी उप्पलवार, क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, प्राचार्य बाळासाहेब गोटे, बदर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या खेळाडूंचे शिवाजी हायस्कूल हराळचे प्राचार्य सुरपाम यांनी काैतुक केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून शिक्षक सौदागर यांची निवड झाली.

Web Title: Haral players nationally