हर्र बोला महादेवाच्या गजराने वाशिम दुमदुमले

By Admin | Updated: August 26, 2014 22:52 IST2014-08-26T22:52:49+5:302014-08-26T22:52:49+5:30

शिव मंदिरात जलाभिषेक

Harah spoke loudly, Lord Shiva, with a garrison, Washim dumudumale | हर्र बोला महादेवाच्या गजराने वाशिम दुमदुमले

हर्र बोला महादेवाच्या गजराने वाशिम दुमदुमले

वाशिम : हर.हर. बोला महादेवाच्या गजराने सोमवार, २५ ऑगस्ट रोजी संपूर्ण वाशिम शहर दुमदुमले
शिवभक्तांची काशी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या वाशिम शहरातील कावडधारकांनी महाराष्ट्र व देशातील १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजन करून अनवानी पायाने चालून कावडीद्वारे खांद्यावर आणलेल्या ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाच्या पाण्याने शहरातील शिवमंदिरात जलाभिषेक केला. वाशिम शहरातून दरवर्षी मोठय़ा संख्येत शिवभक्त युवक ङ्म्रद्धेने तेथील तीर्थ कावडीमध्ये आणून शहरातील शिवमंदिराच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. कावडीद्वारे तीर्थ आणून महादेवाच्या पिंडीच्या जलाभिषेक करण्याची परंपरा वाशिम शहरात इतिहासकालापासून सुरू आहे.
राज्यातील औंढानागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्‍वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्‍वर, ओंकारेश्‍वर, सोरटी सोमनाथ, रामेश्‍वरम, केदारनाथ, ङ्म्रीशैल्यम, मल्लीकार्जुन, महाकालेश्‍वर, काशी विश्‍वेश्‍वर, इत्यादी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, आंध्रप्रदेश व तामिळनाडू आदी राज्यांमध्ये असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या तीर्थस्थानावरून तीर्थजल आणल्यानंतर सर्व शिवभक्तांनी शहरातील मंदिरामध्ये जलाभिषेक केला. शहरातील सर्व कावड मंडळानी रविवारी रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये एकत्र गोळा होऊन तेथे रात्रभर विङ्म्रांती घेतली सोमवार २५ ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजताच कावड मंडळानी वाशिम शहरातून हर्र.. हर्र महादेवाच्या गजरात शोभायात्रा काढून शहरातील शिवमंदिरामध्ये जलाभिषेक करून पारंपरिक ङ्म्रद्धाभक्ती जोपासली शिवभक्तांच्या आगमनामुळे पोलिस विभागाच्या वतीने शहरात तगाडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पाऊस नसल्यामुळे यावर्षी कावडधारकांची संख्या काही प्रमाणात रोडावली असल्याचे मिरवणुकीवरून दिसून आले. कोरड्या दुष्काळाच्या सावटातून कावड मंडळांचा उत्साहही सुटू शकला नाही. कोरड्या दुष्काळामुळे गतवर्षीसारखा अतिउत्साह दिसून आला नाही. कोरड्या दुष्काळामुळे सर्वांच्याच आनंदावर विरजन पडत आहे.

Web Title: Harah spoke loudly, Lord Shiva, with a garrison, Washim dumudumale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.