सत्तेची चावी व्यापा-यांच्या हाती

By Admin | Updated: September 8, 2015 02:13 IST2015-09-08T02:13:44+5:302015-09-08T02:13:44+5:30

वाशिम बाजार समिती निवडणुकीत देशमुख गटाला आठ तर गोटे गटाला सात जागा.

In the hands of power chevy traders | सत्तेची चावी व्यापा-यांच्या हाती

सत्तेची चावी व्यापा-यांच्या हाती

वाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवार, ६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल सोमवार, ७ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने हमाल-मापारी व व्यापारी-अडते या मतदारसंघातून विजयी झालेल्या तीन उमेदवारांच्या हाती आपसूकच सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. देशमुख-ठाकरे गटाला आठ तर गोटे गटाला सात जागा मिळाल्या आहेत. वाशिम बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी एकूण ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. २ हजार ४४८ मतदार असलेल्या या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण -७, महिला -२, इतर मागासप्रवर्ग -१, व्हीजेएनटी-१ अशा एकूण ११, ग्राम पंचायत मतदार संघात सर्वसाधारण -२, अनुसूचित जाती-जमाती- १, आर्थिक दुर्बल घटक -१ अशा एकूण -४, व्यापारी मतदार संघ-२ व हमाल मापारी मतदार संघ-१ अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, आमदार लखन मलिक, माजी आमदार विजयराव जाधव या दिग्गजांचे पॅनल आणि बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव गोटे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. देशमुख-ठाकरे गटाचे आठ उमेदवार तर गोटे गटाचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. हमाल-मापारी संघातून एक व व्यापारी-अडते मतदारसंघातून दोन असे एकूण तीन उमेदवार अद्याप कोणत्याही गटाकडे अधिकृत गेले नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. सदर तीन उमेदवार कोणत्या गटाला पसंती देतात, यावर सत्ता स्थापनेचे गणित अवलंबून राहणार आहे. सर्वसाधारण मतदार संघामधून नारायणराव ऊर्फ बालाजी गोटे, विठ्ठल ऊर्फ राजू चौधरी, दामोदर गोटे, जगदिश दहात्रे, प्रभाकर लांडकर, रामेश्‍वर काटेकर, बापुराव उगले यांनी बाजी मारली. महिला मतदार संघामधून नंदाबाई सुभाष नानवटे व आशाबाई अमृता गोरे, इतर मागासवर्गीय मतदार संघामधून सुरेश मापारी यांनी बाजी मारली. सेवा सहकारी संस्थेच्या भटक्या जाती विमुक्त जाती-जमाती मतदार संघामधून सुभाष राठोड व ग्राम पंचायत मतदार संघाच्या सर्वसाधारण मतदार संघामधून संजय भागवत मापारी व शोभाताई दामोदर काळे यांनी बाजी मारली. ग्राम पंचायत मतदार संघाच्या अनुसूचित जाती मतदार संघामधून मीनाक्षी विनोद सावळे यांनी बाजी मारली. ग्रा.पं. मतदार संघाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधून केशव उद्धव मापारी यांनी बाजी मारली. हमाल, मापारी मतदार संघामधून हिरा रन्नू जानीवाले यांनी बाजी मारली. व्यापार व अडते मतदार संघामधून आनंद चरखा व रमेशचंद्र लाहोटी यांनी बाजी मारली. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून नारायणराव गोटे यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय मिळविला आहे.

Web Title: In the hands of power chevy traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.