गरीब बहिणीच्या निवाऱ्यासाठी सरसावले अनेकांचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:54+5:302021-03-17T04:42:54+5:30

चंद्रकला श्रीचंद राठोड ही महिला मागील अनेक वर्षांपासून छाया नावाच्या मुलीला सोबत घेऊन आसोला येथे वास्तव्यास आहे. भूमिहीन व ...

The hands of many rushed to the shelter of the poor sister | गरीब बहिणीच्या निवाऱ्यासाठी सरसावले अनेकांचे हात

गरीब बहिणीच्या निवाऱ्यासाठी सरसावले अनेकांचे हात

चंद्रकला श्रीचंद राठोड ही महिला मागील अनेक वर्षांपासून छाया नावाच्या मुलीला सोबत घेऊन आसोला येथे वास्तव्यास आहे. भूमिहीन व विधवा असलेल्या चंद्रकलाबाईंची मुलगी छाया ही मानोरा शहरात मिळेल तिथे काम करून आपला व वृद्ध आईचा सांभाळ करपत आहे. बालपणातच पितृछत्र हरविलेल्या छाया राठोड हिचे घर कोसळण्याच्या स्थितीत आहे. उन्हामध्ये प्रचंड तापणारे आणि पावसाळ्यात पूर्णत: गळणाऱ्या घरापासून सुटका व्हावी आणि राज्य अथवा केंद्र शासनाकडून अनुदान रूपात काही राशी मिळाल्यास घर बांधता यावे, या आशेत दोन्ही महिला अनेक वर्षांपासून जगत आहेत. दरम्यान, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनोहर राठोड, विशाल राठोड, ओम बलोदे, जगदीश जाधव यांनी समाजमाध्यमांवर बेघर बहिणीला आर्थिक मदतीची गरज नावाचा ग्रुप तयार करून आपापल्या परीने दोन्ही गरजू महिलांना मदत करण्याचे आवाहन केले. मानोरा तालुका व इतरही ठिकाणांहून दानशूर व संवेदनशील व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे.

Web Title: The hands of many rushed to the shelter of the poor sister