अतिक्रमणावर पुन्हा हातोडा

By Admin | Updated: May 26, 2015 02:07 IST2015-05-26T02:07:22+5:302015-05-26T02:07:22+5:30

वाशिम शहरातील आंबेडकर चौकातील अतिक्रमण हटविले.

Hammer again on encroachment | अतिक्रमणावर पुन्हा हातोडा

अतिक्रमणावर पुन्हा हातोडा

वाशिम : मध्यंतरी काही कारणास्तव स्थगित केलेली अतिक्रमण हटाव मोहीम २५ मेपासून वाशिम नगर परिषदेने पुन्हा नव्या जोमाने हाती घेतली आहे. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोहिमेचा २५ मे रोजी सकाळच्या सुमारास श्रीगणेशा करण्यात आला. वाशिम शहरातील फुटपाथ अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केले आहेत. मुख्य रस्त्यालगत अतिक्रमित जागेवर अनेकांनी दुकानदारी थाटल्याने वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाशिम नगर परिषदेने १६ एप्रिल ते १९ एप्रिल २0१५ या दरम्यान मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. त्यानंतर काही कारणास्तव सदर मोहीम गुंडाळण्यात आल्याने अतिक्रमणधारकांनी पुन्हा फुटपाथवर ह्यदुकानदारीह्ण सुरू केली होती. एका महिन्याच्या दीर्घ विश्रां तीनंतर वाशिम नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात २५ मेपासून शहरातील अतिक्रमण हटविण्याला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पाटणी चौक मार्गे जनता बँक, रिसोड नाका या मार्गालगतचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. अतिक्रमणधारकांनी स्वत:हून खोके हटविले. २६ मेपासून सदर मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी सांगितले. सर्व अतिक्रमणधारकांनी रस्त्यावरील व शासकीय जागेत केलेले अतिक्रमण तत्काळ काढून घ्यावे, अन्यथा सदर अतिक्रमण नगर परिषद यंत्रणेमार्फत काढण्यात येईल, अशा सूचना इंगोले यांनी केल्या आहेत.

Web Title: Hammer again on encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.