रब्बी हंगामात अर्धिअधिक जमीन पेरणीविना!
By Admin | Updated: February 3, 2015 00:00 IST2015-02-03T00:00:46+5:302015-02-03T00:00:46+5:30
वाशिम जिल्ह्यात २0१४-१५ च्या रब्बी हंगामात केवळ ६0 हजार हेक्टरवर पेरणी.

रब्बी हंगामात अर्धिअधिक जमीन पेरणीविना!
संतोष वानखडे / वाशिम:
२0१४ या वर्षातील अल्प पावसाचे दुरगामी परिणाम बळीराजाला भोगावे लागत आहे. २0१३-१४ या वर्षाच्या तुलनेत २0१४-१५ या वर्षात रब्बी हंगामात जिल्ह्यातील अर्धिअधिक जमीन पेरणीविना असल्याची साक्ष कृषी विभागाची आकडेवारी देत आहे. २0१३-१४ या वर्षात एक लाख २७ हजार हेक्टरवर तर २0१४-१५ या वर्षात ६0 हजार ५५४ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे.
जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या खाईत आहे. २0१३ मध्ये अतवृष्टी, २0१४ च्या सुरूवातीला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच पुरता हतबल झालेला होता. अशातच २0१४ मध्ये निसर्गानेही दगा दिला. अत्यल्प पाऊस झाल्याने खरिपाचे उत्पादन शेतकर्यांच्या हाती आले नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. परिणामी, जमिनीत ओलावा राहिला नाही. दज्रेदार जमीन असलेल्या आणि सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. उर्वरीत शेतकर्यांनी जमिन पेरणीविना तशीच ठेवण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रफळात तब्बल ६६ हजार ६४१ हेक्टरची घट आली आहे. २0१३-२0१४ मध्ये रब्बी ज्वारी ३६९ तर २0१४-२0१५ मध्ये ९३४ हेक्टर पेरणी झाली आहे. २0१३-२0१४ मध्ये गहू ३0 हजार ५0५ तर २0१४-२0१५ मध्ये १४ हजार ८५७ हेक्टरपर्यंत पेरणी घसरली आहे. २0१३-२0१४ मध्ये मक्का ४६ तर २0१४-२0१५ मध्ये २३0 हेक्टर, २0१३-२0१४ मध्ये हरभरा ९४ हजार एक हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी अध्र्यापेक्षाही कमी पेरणी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २0१४-२0१५ मध्ये केवळ ४३ हजार ७९३ हेक्टरवर हरभर्याची पेरणी झाली आहे.